Results 2020 (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस संकटामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक बिघडले आहे. त्यामुळे लांबणीवर पडलेल्या एमएच सीईटी परीक्षांचे (MHT CET Exam 2020) निकाल लवकरच जाहीर केले जातील. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन माध्यमातून झालेल्या या परीक्षांचे निकाल लवकरच cetcell.mahacet.org वर जाहीर केले जातील. 28 नोव्हेंबरपर्यंत सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील, असे राज्य सीईटी सेलने सांगितले. एमएच सीईटी परीक्षा राज्यभरातील अनेक ज्युनिअर कॉलेजद्वारे घेण्यात आल्या होत्या. 1 ते 9 आणि 12 ते 20 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा पार पडल्या. मात्र त्या काळातील असलेल्या संकटांमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी 7 नोव्हेंबर रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. (MHT CET Result 2020 Date Confirmed: एमएचटी सीईटी चा निकाल 'या' दिवशी होणार घोषित, विद्यार्थ्यांना mahacet.org. वर पाहता येणार रिजल्ट)

2020-21 च्या प्रवेश प्रक्रीयेसाठी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार, एमएचटी-सीईटी ची मेरिट लीस्ट जाहीर करण्यात येईल. मेरिट लिस्टच्या कॉऊन्सलिंग रजिस्ट्रेशन राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी पसंत केलेल्या कॉलेजेस आणि कोर्सेसनुसार मेरिट लिस्ट जाहीर होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर कॉऊन्सलिंग राऊंडच्या तारखा आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादीही जाहीर करण्यात येईल.

MHT CET 2020 चा निकाल कसा पाहाल निकाल?

# MHT CET च्या अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org ला भेट द्या.

# दुसऱ्या सेक्शनमधील MHT CET result वर क्लिक करा.

# पुढील विंडो मध्ये लॉगईन क्रेडिनशियल्स टाका.

# सब्मिट बटण दाबल्यानंतर तुम्हाला स्क्रिनवर तुमचे गुण दिसतील.

सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कॉन्सलिंग प्रोसेसला सुरुवात होईल. MHT CET 2020 ची कॉन्सलिंग प्रोसेस तीन टप्प्यात पार पडेल. यात रजिस्ट्रेशन, फी आणि डॉक्युमेंट व्हेरिफीकेशन याचा समावेश आहे. त्यानंतर एक स्पॉट राऊंड सुद्धा असेल. सीईटी सेल एमएचटी सीईटी 2020 पात्र उमेदवारांसाठी कोणतेही समुपदेशन शुल्क आकारण्यात येणार नाही. परंतु, जेईई मेन उमेदवारांना एमएचटी सीईटी नोंदणीनंतर आवश्यक फी देखील भरावी लागेल.