MHADA Mill Worker Lottery: मे महिन्यात जाहीर होणार गिरणी कामगारांच्या 2521 घरांसाठी सोडत
म्हाडा (Photo Credits-Facebook)

मुंबईमधील गिरणी कामगारांच्या (MHADA Mill Worker) घरांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) ठप्प पडलेल्या 56 गिरण्यांमधील कामगारांच्या वारसांना आता घरं देण्यासाठी पुन्हा वेग आला आहे. MMRDA कडून याबाबतची लॉटरी येत्या मे महिन्यात निघणार आहे. यामध्ये 2521 घरांचा समावेश आहे.

महाराष्ट्र सरकार कडून राज्यात 1 लाख 75 हजार गिरणी कामगारांना घरं देण्याची घोषणा करण्यात आली आहे. टप्प्या टप्प्याने ही दिली जात असताना मध्यंतरी त्याचा वेग मंदावला होता. पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे आता गृहनिर्माण विभागाने हस्तक्षेप करून म्हाडा आणि MMRDA मधील विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

MMRDA कडून ठाणे जिल्ह्यात्तील रांजनोळी, रायगडातील रायचूर आणि पनवेल मधील कोल्हे भागात घरं बांधण्यात आली आहेत. 2521 घरं बांधण्यात आली असून आता MMRDA कडून घराचा ताबा म्हाडा कडे दिला जाणार आहे. वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयामध्ये ही लॉटरी काढली जाण्याचा अंदाज आहे.

दरम्यान म्हाडाच्या घरांच्या सोडतींसाठी अर्जदारांची प्रारूप यादी वेबसाईटवर दिली जाणार आहे. त्यामध्ये काही हरकत असल्यास 29 एप्रिलपर्यंत हरकत लेखी स्वरूपात सादर करण्याच्या सूचना आहेत.

2020 साली मुंबईमध्ये  3894 घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती. मुंबई मधील बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल (Bombay Dyeing Textile Mill), बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल (Bombay Dyeing Spring Mill), श्रीनिवास मिल (Shrinivas Mill) या जागी बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या घरांची त्यावेळेस सोडत जाहीर झाली होती.