mhada (pic credit - mhada twitter )

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हाडा भरती (MHADA Recruitment Exams) परीक्षेबाबत ग्वाही देऊनही ही परीक्षा (MHADA Exams) रद्द करावी लागली. गोपनीयतेचा भंग झाल्याच्या कारणास्तव ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे संभाव्य पेपरफुटी टळल्याचा दावा करण्यात येत असला तरी परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागलाच. दरम्यान, परीक्षा रद्द होण्याची नामुष्की आणि पेपरफुटीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी म्हाडा आता जोरदार सक्रीय झाली आहे. यापुढे म्हाडा भरती परीक्षा टीसीएस (TCS) च्या मदतीने घेतल्या जाणार आहेत. म्हाडाची परीक्षेबाबत एक बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

म्हाडा परीक्षा रविवारी (12 डिसेंबर) होणार होती. मात्र, गोपनियते भंग झाल्याच्या कारणास्तव ती रद्द करण्यात आली. त्यानंतर एका व्हिडिओच्या माध्यमातून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थी आणि परीक्षार्थींना झालेल्या मनस्तापाबद्दल माफी मागत असल्याचे म्हटले. या व्हिडिओत आव्हाड यांननी म्हटले होते की, 'अपरिहार्य कारणामुळं आणि तांत्रिक अडचणीमुळं म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. दरम्यान, रात्रीच्या सुमारास आव्हाड यांनी ही परीक्षा रद्द झाल्याचे म्हटले होते. हे सांगताना त्यांनी म्हटले होते की, 'ही माहिती एवढ्या रात्री यासाठी देतोय की विद्यार्थ्यांनी सेंटरवर जाऊ नये, त्यांना त्रास होऊ नये. परत एकदा क्षमा मागतो' ' तसेच, आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले होते की, यापुढे म्हाडा कोणावरही विसंबून राहणार नाही. परीक्षेचा पेपर म्हाडा स्वत:च तयार करेल तसेच, परीक्षाही स्वतंत्र घेण्याबाबत विचार करेण. त्यानंतर म्हाडाने तातडीने निर्णय घेतला की, म्हाडाटी परीक्षा टीसीएसच्या माध्यमातून घेतली जाईल. (हेहाी वाचा, MHADA Recruitment & Paper Leak: 'म्हाडा स्वत: तयार करणार प्रश्नपत्रिका', Exam गोपीनीयता भंग प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांची घोषणा)

जितेंद्र आव्हाड ट्विट

प्राप्त माहितीनुसार, म्हाडा परीक्षेसाठी सकाळच्या सत्रासाठी सुमारे 50,000 तर दुपारच्या सत्रासाठी 56,000 उमेदवार परीक्षा देणार होते. मात्र, परीक्षाच रद्द झाल्याने या सर्वांच्याच उत्साहावर पाणी फिरले. या सर्वांसह परीक्षा प्रक्रिया राबविणाऱ्या आणि त्यात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला. राज्य सरकारच्या विविध भरती परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार चालतात. दलालीही होते असे अनेकदा पुढे आले आहे. म्हाडा परीक्षेतही हा प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत आल्या होत्या. यावर दलाली मोडीत काढली जाईल, असे आव्हाड यांनी व्हिडिओद्वारे म्हटले होते.