Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

म्हाडा परीक्षांबाबत (MHADA Exam ) गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. या पुढे म्हाडा कोणावरही विसंबून राहणार नाही. म्हाडासाठी आवश्यक नोकर भरतीतील परीक्षेची प्रश्नपत्रिका म्हाडा (Jitendra Awhad) स्वत: तयार करेन, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. म्हाडा परीक्षा निश्चित कार्यक्रमानुसार आज (रविवार,12 डिसेंबर) पार पडणार होती. मात्र, परीक्षेसंदर्भात गोपीनियता भंग ( MHADA Recruitment & Paper Leak) झाल्याची घटना घडली. पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना पुढे आली. त्यानंतर म्हाडाने तातडीने आपली परिक्षा रद्द  केली. या सर्व प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत म्हटले की, म्हाडा परीक्षेचे पेपर फुटल्याचे पुढे आले नाही. मात्र, गोपनीयता भंग झाला आहे. पेपर फोडणाऱ्या टोळीस पेपर फुटीच्या आगोदरच पोलिसांनी पकडले आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटीतील आरोपींच्या संवादामध्ये म्हाडाच्या परीक्षा आणि प्रश्नपत्रिकांबाबत उल्लेख होता. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करुन आरोपींना पकडेल. तसेच, परीक्षाही स्थगित करण्यात आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

म्हाडाच्या पेपरसंदर्भात केवळ एकाच व्यक्तीला माहिती होती. तरीही पेपर फुटलेच कसे? याबाबत नक्कीच चौकशी करण्यात येईल. गोपनियतेचा भंग झाल्याबद्दल पोलीस तपास करत आहे. तपासाअंती दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही आव्हाड म्हणाले. (हेही वाचा, MHADA Exams 2021: म्हाडा ची परीक्षा ऐनवेळेस रद्द; मंत्री Jitendra Awhad यांची ट्वीट करत माहिती)

दरम्यान, म्हाडाच्या परीक्षा नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार होत्या. मात्र, त्या अचानक रद्द करण्यात आल्या. त्यमुळे विद्यार्थी आणि परीक्षार्थींना झालेल्या मनस्तापाबद्दल आम्ही माफी मागतो. जे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि त्यांना परीक्षा देता आली नाही. त्या सर्वांची फी माफ केली जाणार आहे. तसेच, पुढील परीक्षेसाठी त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. याच वेळी यापुढे म्हाडा स्वत:च प्रश्नपत्रिका तयार करेल असेही आव्हाड म्हणाले.