Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

म्हाडा (MHADA) कडून आज (12 डिसेंबर) मुंबईत विविध पदांवर भरतीसाठी आयोजित परीक्षा अचानक रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा रद्द करावी लागत असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Dr.Jitendra Awhad) यांनी दिली आहे. काल रात्री उशिरा त्यांनी ही माहिती ट्वीटर वर एका व्हिडीओ द्वारा देत परीक्षार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलिगीरी व्यक्त केली आहे. मात्र एनवेळेस परीक्षा रद्द झाल्याचं समजल्याने परीक्षा केंद्रांवर पोहचलेल्या विद्यार्थ्यांचा पुन्हा संताप अनावर झाला आहे.

कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक निधी सल्लागार,कनिष्ठ अभियंता, (स्थापत्य) या पदांसाठी आज सकाळ आणि दुपारच्या सत्राच्या परीक्षा आयोजित करण्यात आली होती मात्र आता ही परीक्षा 2022 मध्ये आयोजित केली जाईल असे सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: MHADA Exam 2021 Rumors: म्हाडाच्या परीक्षा पारदर्शकपणे पार पडणार- जितेंद्र आव्हाड .

जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट

यापूर्वी एमपीएससी आणि आरोग्य विभागाच्या परीक्षा घेताना देखील असाच प्रकार समोर आला होता. राज्य सरकार कडून ऐन वेळेस परीक्षा रद्द होत असल्याने इतर जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या वेळेचा, पैशांचा नाहक चुरडा होतो.