MHADA Exam Paper Leak:  म्हाडा परीक्षा पेपर फुटी प्रकरणी 6 आरोपींना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
mhada (pic credit - mhada twitter )

म्हाडा (MHADA)  कडून रविवार 12 डिसेंबर ला मुंबईत 500 हून अधिक विविध पदांच्या भरतीसाठी होणारी परीक्षा पेपर फुटल्यान रद्द करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून 6 आरोपींना पकडण्यात आलं आहे. या सर्व आरोपींना न्यायालयाकडून 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. हे देखिल वाचा:  MHADA Recruitment & Paper Leak: 'म्हाडा स्वत: तयार करणार प्रश्नपत्रिका', Exam गोपीनीयता भंग प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांची घोषणा.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या माहितीनुसार, म्हाडा परीक्षेचा पेपर फोडल्याच्या प्रकरणात औरंगाबाद, जालना, बीड, पुणे, ठाणे मध्ये आरोपी शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली. औरंगाबाद येथील टार्गेट करिअर पॉईंट या संस्थेचे संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडेमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे, पुण्यामध्ये राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ, डॉ. प्रितीश देशमुख या 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे काही पेपर, पेन ड्राईव्ह आदी साहित्य सापडले आहे.

काही आरोपींचे मोबाइल नंबर देखील मिळाले आहेत. या कारवाईमधून आणखी नावे समोर येण्याची शक्यता असल्याने आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस असं ट्विट विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.