Megablock 29th September: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे प्रवाशांना दिलासा
Megablock (Photo Credits:Twitter)

मुंबई लोकल (Mumbai Local) च्या मध्य (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गांवर उद्या 29 सप्टेंबर म्हणजेच रविवारी तांत्रिक कामानिमित्त मेगाब्लॉक (Megablock)  घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वे (Western Railway) च्या प्रवाशांना उद्या ब्लॉक पासून दिलासा मिळणार आहे. याऐवजी आज 28 सप्टेंबर रोजी मध्यरात्री बोरिवली- भाईंदर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे ने याबाबत एका ट्विट मार्फत दिलेल्या माहितीनुसार मुलुंड (Mulund) ते माटुंगा (Matunga)  स्थानकांच्या दरम्यान डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर हार्बर मार्गावर वाशी ते कुर्ला अप व डाऊन मार्गावर ब्लॉकचे नियोजन करण्यात आलेले आहे.

उद्या या ब्लॉकच्या निमित्ताने लोकलफेऱ्या या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून मगच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे..

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकाच्या दरम्यान सकाळी 10.30  पासून ते दुपारी 3  पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. डाऊन जलद व सेमी फास्ट गाड्यांची वाहतूक ठाण्यापर्यंत धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे, या गाड्या सायन व मुलुंड स्थानकाच्या दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. ही वाहतूक साधारण 20  मिनिटे उशिराने अपेक्षित आहे. तसेच अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्लायेथे देखील थांबतील. अप जलद व धीम्या मार्गावरील सेवा 15 मिनिटे उशिरा असेल.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर उद्या सकाळी 11.10 ते 3.40 पर्यंत कुर्ला ते वाशी अप व डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या वेळेत हार्बर मार्गावर सीएसएमटीवरून लोकल सुटणार नाहीत. तसेच पनवेल, बेलापूर वाशी येथूनसीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलची वाहतूक देखील बंद असेल. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी तेकुर्ला व वाशी ते पनवेल अशा विशेष गाड्या सुरु असणार आहेत. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकिटावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

पहा ट्विट

दरम्यान, पश्चिम रेल्वे वर आज (28 सप्टेंबर) रोजी रात्रीपासून ते 29 सप्टेंबर पहाटेपर्यंत भाईंदर ते बोरिवली दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्या,उले प्रवाशांना उद्या ब्लॉकपासून किंचित दिलासा मिळणार आहे.