Mega Recruitment in Health Department: राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केली 8500 जागांसाठी मेगाभरती, 'या' दिवशी होणार परीक्षा
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोक-यां वर गदा आल्यामुळे बरेच होतकरू तरूण बेरोजगार आले. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य विभागाने एक आनंदाची बातमी आणली आहे. लवकरच राज्यात आरोग्य विभागामार्फत 8500 जागांसाठी मेगाभरती (Mega Recruitment in Health Department) होणार आहे. नुकतीच त्यांनी याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50% पदांसाठी आहे. त्यामुळे इच्छुकांनी www.mahapariksha.gov.in व www.arogya. maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

येत्या 28 फेब्रुवारीला या पदांकरिता परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील. या भरतीची अनेक उमेदवार गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते. महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर नोकरभरतीबाबत ही पहिलीच मोठी घोषणा असल्याचे सांगण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Anil Deshmukh On Police Bharti: राज्यात पोलिस भरतीसाठी पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू - अनिल देशमुख

सदर परीक्षा संपूर्ण राज्यात दिनांक 28 फेब्रुवारी 2021 ला एकाच दिवशी घेण्यात येईल. याबाबतचा तपशील वेळोवेळी वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल.

आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पद भरतीसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती; परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल रह झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे. 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एसईबीसी उमेदवार हे आर्थिक दुर्बल प्रवर्गाचा लाभ घेऊ शकतात असे सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.