Mega Bharti 2020: महाराष्ट्र राज्यात सरकारी नोकर भरती प्रक्रिया ऑफलाईनच होणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन; रोहित पवार यांची ट्विट वरून माहिती
रोहित पवार (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्र राज्य (Maharashtra Government Jobs) सरकार मधील विविध रिक्त पदांवरील महाभरती साठी घेण्यात येणारी संपूर्ण प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्याची माहिती आज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे."रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही सांग. यापुढील नोकर भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच होईल", अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. वास्तविक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात सुरु झालेल्या महापोर्टलमुळे (Mahait Portal) अनेकांना भरती प्रक्रियेत वाईट अनुभव आला आहे त्यामुळे ठाकरे सरकारची सत्ता येताच पोर्टल वर स्थगिती आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. Sarkari Naukri: 10 वी पास ते MBA उमेदवारांसाठी राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरची संधी

प्राप्त माहितीनुसार, सरकारने येत्या 15 एप्रिलपर्यंत खाजगी संस्था नियुक्त करुन 20 एप्रिलपासून मेगाभरतीला 1 लाख 6 हजारांची भरती काढली होती. मात्र यावर रोहित पवार यांनी आक्षेप घेत, "नोकर भरती ही ऑनलाईन पद्धतीने न होता ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्ट्राला ते का शक्य होऊ नये? अशी भूमिका रोहित यांनी घेतली होती. याच मागणीसह रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता त्यावेळी मुख्यमंत्र्यानी ऑफलाईन भरतीचे आश्वासन दिले आहे.

रोहित पवार ट्विट

दरम्यान, सद्य स्थितीत राज्यात जवळपास 2 लाख पदांसाठी भरती होणार आहे, गृह खातं, सामाजिक न्याय, कृषी व पशु संवर्धन, महिला व बालविकास सहित अनेक खात्यांमध्ये भरती होणे आहे, यातील 1 लाख 6 हजार जागांसाठीची आरक्षण पडताळणी सुद्धा घेण्यात आली आहे.