उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

ठाकरे कुटुंब आणि मातोश्री (Matoshree) हे समीकरण फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाचे मुख्य निवासस्थान म्हणून मातोश्रीचे खास असे महत्व आहे. 70 च्या दशकात मुंबईच्या बांद्रा (Bandra) या परिसरात हे अलिशान घर बांधले गेले. त्यानंतर या कुटुंबाच्या सर्व पिढ्या इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या. आता ठाकरे कुटुंबियांचे दुसरे घर मातोश्री 2 (Matoshree 2) हे देखील बांधून तयार झाले आह. बांद्रा परिसरातच ही टोलेजंग अशी 8 माजली इमारत आहे.

ठाकरे कुटुंबाने 2016 मध्ये 11 कोटी 60 लाख रुपयांना कलानगर परिसरात जमीन विकत घेतली होती. याच इमारतीवर ही नवी भव्य इमारत उभी आहे. जुन्या मातोश्रीपासून अवघ्या काही सेकंदावर ही इमारत आहे. या इमारतीचे क्षेत्र तब्बल 10 हजार स्‍क्‍वेअर फूट इतके आहे. या इमारतेच्या वैशिष्ठ्यांबद्दल बोलायचे झाले तर, या इमारतीत 3 ड्युप्लेक्स फ्लॅट आहेत. 5 बेडरुम, स्टडी रुम, होम थिएटर, स्विमिंग पूल, हायटेक जिम आणि भव्य हॉल अशा अनेक गोष्टींनी ही इमारत सज्ज आहे. या इमारतीला कलानगर व बीकेसी अशा दोन बाजूंना प्रवेशद्वारे आहेत. (हेही वाचा: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री; जाणून घ्या 'मातोश्री' ते 'वर्षा'पर्यंतचा त्यांचा प्रवास)

दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' बंगल्यावर राहायला जाणार असे संकेत दिले होते. त्यानंतर आता मातोश्री 2 मध्ये कोण वास्त्यव्य करणार हे लवकरच समजेल. या इमारतीचे फर्निचर आणि इतर कामे पूर्ण होण्यास अजून 1 वर्ष लागणार आहे. दरम्यान मातोश्री या निवास्थानाचे महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठे महत्व आहे. 1995 ते 1999 या कालावधीमध्ये जेव्हा राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार होते त्यावेळी बाळासाहेबांनी मातोश्रीवरूनच आपल्या रिमोट कंट्रोलने सरकार चालवले. आतापर्यंत मातोश्री हा बंगला अनेक राजकीय खलबतांचा, घटनांचा साक्षीदार राहिला आहे.