Neral-Aman Lodge Service Suspended: समुद्रसपाटीपासून 2600 फूट उंचीवर उभे असलेले माथेरान (Matheran) हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई-पुण्यातील अनेक लोक शनिवार-रविवारसाठी माथेरानला भेट देतात. मात्र आता मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान नॅरो गेज मार्गावरील नेरळ-अमन लॉज (Neral-Aman Lodge) विभागादरम्यानची नियमित प्रवासी सेवा, 08.06.2024 ते 15.10.2024 या कालावधीत पावसाळ्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रेल्वेकडून माथेरान-अमन लॉज दरम्यानची शटल सेवा चालवली जाणार आहे.
माथेरान हिल स्टेशनला रेस्ते किंवा ट्रेनने जाता येते. या हिल स्टेशनच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ आहे. नेरळला जाण्यासाठी कर्जत आणि खोपोली अशा दोन गाड्या आहेत. नेरळ ते माथेरान हे अंतर अंदाजे 10 किमी आहे. पुढे माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथून नॅरो गेज मार्गावर टॉय ट्रेन सुरू होते.
माथेरान-अमन लॉज शटल सेवा वेळ-
(अ) माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दैनंदिन)
52154 माथेरान येथून 8 वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे 8.38 वाजता पोहचेल
52156 माथेरानहून 09.10 वाजता सुटेल आणि 09.28 वाजता अमन लॉजला पोहोचेल.
52158 माथेरानहून 11,35 वाजता निघेल आणि 11.53 वाजता अमन लॉजला पोहोचेल.
52160 माथेरानहून 14.00 वाजता सुटेल आणि 14.18 वाजता अमन लॉजला पोहोचेल.
52162 माथेरानहून 15.15 वाजता सुटेल आणि 15.33 वाजता अमन लॉजला पोहोचेल.
52164 माथेरानहून 17.20 वाजता सुटेल आणि 17.38 वाजता अमन लॉजला पोहोचेल.
(शनिवार/रविवारी)-
स्पेशल-2 माथेरानहून 10.05 वाजता निघेल आणि 10.23 वाजता अमन लॉजला पोहोचेल.
स्पेशल-4 माथेरानहून 13.10 वाजता सुटेल आणि 13.28 वाजता अमन लॉजला पोहोचेल.
(ब) अमन लॉज-माथेरान शटल सेवा (दैनंदिन)
52153 अमन लॉज येथून 08.45 वाजता सुटेल आणि माथेरानला 9.03 वाजता पोहोचेल.
52155 अमन लॉज येथून 09.35 वाजता सुटेल आणि 09.53 वाजता माथेरानला पोहोचेल.
52157 अमन लॉज येथून 12.00 वाजता सुटेल आणि 12.18 वाजता माथेरानला पोहोचेल.
52159 अमन लॉज येथून 14.25 वाजता सुटेल आणि 14.43 वाजता माथेरानला पोहोचेल.
52161 अमन लॉज येथून 15.40 वाजता सुटेल आणि 15.58 वाजता माथेरानला पोहोचेल.
52163 अमन लॉज येथून 17.45 वाजता सुटेल आणि 18.03 वाजता माथेरानला पोहोचेल.
(शनिवार/रविवारी)
विशेष-1 अमन लॉज उपविभाग. 10.30 वाजता सुटेल आणि 10.48 वाजता माथेरानला पोहोचेल
विशेष-3 अमन लॉज उपविभाग 13.35 वाजता सुटेल आणि 13.53 वाजता माथेरानला पोहोचेल.
दरम्यान, सर्व शटल सेवा 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील. प्रवाशांनी कृपया बदलांची नोंद घ्यावी आणि शटल सेवा सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वेने केली आहे.