मराठा आरक्षण (Maratha Reservation) स्थगिती आणि पुढील वाटचाल यासाठी सातारा येथे एक गोलमेज परिषद (Round Table Conference) आयोजित करण्यात आली. या परिषदेला खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale ) हे दोघेही उपस्थित राहणार अशी माहिती देण्यात आली होती. परंतू, आयत्या वेळी उदयनराजे भोसले यांनी या परिषदेकडे पाठ फिरवली. त्यामुळे उदयनराजे या परिषदेला का आले नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शिवेंद्र राजे भोसले मात्र या परिषदेला उपस्थित राहिले असल्याचे समजते. एबीपी माझा आणि टीव्ही नाईन या वृत्तवाहिन्यांनी याबाबत वृत्त दिले आहे.
मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, मराठा आरक्षण संघर्ष समिती, मराठा आरक्षण समन्वय समिती या समित्यांचे पाच जिल्ह्यांमधील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माहिती सुरेश दादा पाटील यांनी दिली दिली होती. मात्र, या परिषदेत विविध ठरवांना मंजूरीही देण्यात आली. परंतू, असे असले तरी सातारा येथे आयोजित करण्यात आली असूनही, उदयनराजे भोसले हे या परिषदेस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्याचीर प्रसारमाध्यमांतूनही चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, या आधी पुढे येथे झालेल्या बैठकीलाही उदयनराजे भोसले हे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे एकापाठपाठ एक अशा दोन वेळी उदयनराजरे भोसले उपस्थित राहू शकले नाहीत. सातारा येथील सम्राट कार्यालयात ही परिषद आयोजित करण्यात आली. या बैठकीस शिवेंद्र राजे आणि उदयनराजे असे दोघेही उपस्थित राहणार असल्याने मराठा बांधव मोठ्या आपेक्षेने या परिषदेकडे पाहात होते. (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा आरक्षण संदर्भात तातडीने घटनापीठाची स्थापना करून अंतरिम आदेशाची सुनावणी करावी; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना लेखी विनंती)
दरम्यान, मराठा आरक्षण हा आता केवळ एका समाजाचा विषय राहिला नसून त्याला व्याप्त स्वरुप मिळाले आहे. मराठा आरक्षणावरुन राजकीय संघर्षही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ओबीसी समूहही सतर्क झाले असून, कोणाला आरक्षण मिळत असेल तर आपली हकरत नाही. परंतू, आम्हाला मिळालेल्या आरक्षणात नवा समूह टाकू नका अशी त्यांची मागणी आहे.