मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणी साठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात अनेक मोर्चे काढण्यात आले आहे. यामुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. “15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे. हेच तुमचे धोरण होते,” अशा शब्दात पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
मी आणि स्वतः देवेंद्रजी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला सहकार्य करायला तयार आहोत. मराठा समाजाचे कल्याण व्हावे म्हणून भाजपा सदैव सहकार्याच्या भूमिकेत आहे. आतातरी ठाकरे सरकारने संवेदनशीलता दाखवत आरक्षणासाठी योग्य पावले उचलावी. तसेच आरक्षण मिळेपर्यंत इतर उपलब्ध पर्याय लागू करावे. हे देखील वाचा- Lockdown in Thane: ठाणे शहरातील 11 हॉटस्पॉट ठिकाणामध्ये आजपासून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन; केवळ अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
चंद्रकांत पाटील यांचे ट्वीट-
अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला !
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 13, 2021
आम्ही मराठा समाजाला दिलेले आरक्षण 102 व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वीचे आहे. आम्ही हे ठामपणे उच्च न्यायालयात मांडल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण या सरकारने सर्वोच्च न्यायालयात विषयाला फाटे फोडून मराठा आरक्षणात गोंधळ निर्माण केला. मराठा समाजासमोर अनंत समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा समाजासाठी करण्यासारखे खूप काही आहे, पण हे अकार्यक्षम सरकार मुद्दाम मराठा समाजाची हेळसांड करत आहे, असेही चंद्रकात पाटील म्हणाले आहेत.
मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी राष्ट्रवादी-काँगेस पक्षाने आजपर्यंत घेतली. अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाची प्रलंबित असणारी मागणी भाजपा सरकारने निकराचा लढा देऊन पूर्ण केली. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या अडचणी पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा केला, अशीही टीका त्यांनी केली आहे.