Lockdown in Thane: ठाणे शहरातील 11 हॉटस्पॉट ठिकाणामध्ये आजपासून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन; केवळ अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
लॉकडाउन I प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: PTI)

Lockdown in Thane: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना संसर्गाचे (COVID-19) प्रमाण सतत वाढत आहे. परिणामी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग गंभीर होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोना विषाणूचे 15 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले. कोरोनाचा वाढता कहर पाहता राज्य सरकारने अनेक जिल्ह्यात लॉकडाउन व नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. अशातचं आता ठाण्यातील 11 हॉटस्पॉट्स असणाऱ्या ठिकाणी 13 मार्च ते 31 मार्च या कालावधीत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, 19 दिवसांच्या कालावधीत देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान लावलेले सर्व निर्बंध लागू होतील. यावेळी, मेडिकल शॉप, डेयरी, किराणा सामान व इतर सर्व आवश्यक वस्तूंशी संबंधित दुकाने खुली राहतील. परंतु, सर्व व्यावसायिक प्रतिष्ठान बंद राहतील. तसेच शाळा व महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था इत्यादी बंद राहतील. (वाचा - महाराष्ट्र: सावधान! विकेंड करिता घराबाहेर पडणा-यांनी, जाणून घ्या राज्यात कुठे कुठे आहे Weekend Lockdown?)

याशिवाय सिनेमा हॉल, जलतरण तलाव, व्यायामशाळा, करमणूक पार्क, बार व सभागृह, नाट्यगृह, असेंब्ली हॉल व तत्सम ठिकाण बंद राहतील. लॉकडाऊन दरम्यान सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या मेळाव्यासारख्या कार्यक्रमांना अनुमती दिली जाणार नाही.

देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 24,882 नवीन रुग्ण आढळले. यासह, सकारात्मक प्रकरणांची संख्या वाढून 1,13,33,728 झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 140 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 1,58,446 वर पोचली आहे.