Maratha Mukh Morcha in Kolhapur | (Photo Credits: Facebook)

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण (Maratha Reservation) या मुद्द्यावर कोल्हापूर (Maratha Mukh Morcha in Kolhapu) येथे मराठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी 11 वाजता या मोर्चास सुरुवात झाली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या मोर्चात उपस्थिती दर्शवली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही मोर्चाचा ठिकाणी येऊन या आंदोलनास आपला पाठिंबा असल्याचे पत्र दिले आहे.

मूक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी आज सकाळपासूनच कोल्हापूरात गर्दी वाढताना दिसत होती. सकाळी 8 वाजल्यापासून आंदोलक छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थलाजवळ जमण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. राजर्षी शाहू महाराज याच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकर यांनी मूक मोर्चा आंदोलनात सहभाग घेतला. (हेही वाचा, Maratha Mukh Morcha in Kolhapur: मराठा आरक्षण मुद्द्यासह 'मूक मोर्चा' आंदोलनात असतील 'या' प्रमुख मागण्या)

मूक मोर्चा आंदोलकांच्या आयोजकांनी केलेल्या अवाहनानुसार जवळपास सर्वच आंदोलक काळे कपडे आणि काळे मास्क घालून आंदोलनात सहभागी झाले आहेत. काही लोक साध्या कपड्यातही आले आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनीही काळे कपडे आणि मास्क परिधान करत मोर्चात सहभाग दर्शवला. आंदोलकांच्या हातात भगवे झेंडेही पाहायला मिळाले.

संभाजी छत्रपती फेसबुक पोस्ट

दरम्यान, भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनीही मोर्चास्थळी हजेरी लावत छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांना एक पत्र दिले. मराठा मोर्चा आंदोलनास आपला पाठिंबा असल्याचे हे पत्र असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या आंदोलनास आपण नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून आलो असल्याची पूस्तीही चंद्रकांत पाटील यांनी जोडली.