मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणूक (Mumbai Agricultural Produce Market Committee Election) जाहीर झाली आहे. येत्या 31 ऑगस्टला ही निवडणूक पार पडत आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भावाच्या भीतीने लांबणीवर पडलेल्या अनेक निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. निवडणुकांच्या तारखा आणि कार्यक्रम हळूहळू जाहीर होऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानंतर या निवडणुका पार पडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे या निवडणुकीची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक (MAPMC Election 2020) फेब्रुवारी 2020 मध्येच पार पडली आहे. या निवडणूकीत महाविकासआघाडी सरकारचा एकतर्फी निवडणूक पार पडली होती. मात्र, सभापती पदाची निवडणूक पार पडण्यापूर्वी कोरोना व्हायरस संसर्गामुळे लॉकडाऊन सुरु झाला. परिणामी निवडणूक लांबणीवर पडली होती.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पक्षीय बलाबल
- एकूण संचालक संख्या - 18
- राष्ट्रवादी काँग्रेस- 16
- शिवसेना- 01
- बंडखोर (शिवसेना)- 1
- काँग्रेस- 4
- राष्ट्रवादी काँग्रेस संबंधीत- 8
- भाजप-0
(हेही वाचा, पुणे: लोकसभा निवडणूक 2019 मध्ये झाली थकलेली उधारी 2020 मध्ये मिळणार)
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थान मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रचंड ताकद लावली होती. परंतू, अनेक प्रतत्न करुनही भाजपला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता मिळवणे सोडा भाजपला एकही जागा निवडूण आणता आली नाही. दरम्यान, महाविकासआघाडीतर्फे सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, कोण निवडूण येणार याबाबत उत्सुकता आहे.