मनमाड (Manmad) येथे एका महिलेने एका तरुणांसोबत लग्न करुन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र यापूर्वी चार लग्न केल्यानंतर पाचव्या वेळेस पुन्हा एकदा लग्नासाठी तयार झालेल्या याच तरुणीचे तिने केलेल्या कर्मांचे पितळ उघडे पडल्याने तिला अटक करण्यात आली आहे.
जयेश डोंगरे या तरुणाच्या लग्नासाठी त्याच्या घरातील मंडळींकडून तरुणीचे शोध घेत होते. त्यावेळी लातूर येथील ज्योती बेंद्रे या तरुणीचे नाव सुचवण्यात आले. त्यानंतर जयेश आणि ज्योती यांचे लग्नसुद्धा झाले. मात्र लग्नापूर्वी बेंद्रे कुटुंबियांनी आमची परिस्थिती हालाखीची असल्याचे सांगितले. त्यामुळे जयेश याच्या घरातील मंडळींनी ज्योतीच्या घरातील मंडळींना लाखो रुपये देत तिलासुद्धा जवळजवळ 50 हजार रुपयांचे दागिने लग्नात भेट दिले. परंतु ज्योती ही काही दिवस जयेशच्या घरात नांदली त्याच्या काही दिवसानंतर आपल्या माहेरी निघुन गेल्यानंतर पुन्हा सासरी परतलीच नाही.
(वर्धा: पाऊस पडावा म्हणून लावले बाहुला-बाहुलीचे लग्न; पहा फोटोज)
या प्रकारानंतर डोंगरे कुटुंबियांनी आपली सून सासरी का येत नाही याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्योती हिची पूर्ण सखोल माहिती मिळवल्यानंतर यापूर्वी तिची तीन लग्न झाल्याचे त्यांना कळले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. मात्र चौथ्या नवऱ्याला चुना लावून पाचव्या तरुणासोबत लग्न करण्याच्या तयारीत असतानाच ज्योती हिला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणी ज्योती हिच्या घरातील मंडळींवर फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.