Dead Body | Pixabay.com

वसई (Vasai) मध्ये 27 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. राहत्या घरी त्याने सिलेंडर मधील carbon monoxide श्वसनातून शरीरात घेतल्याने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. हा आत्महत्येचा एक विचित्र प्रकार आहे. दरम्यान मृत व्यक्तीचं नाव Shrey Agarwal आहे. वसई पूर्व भागातील एका भाड्याच्या बंगल्यामध्ये त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ पसरली आहे.

श्रेयची बहीण मागील दोन दिवसापासून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याच्याशी संपर्क होत नसल्याने अखेर तिने पोलिसामध्ये तक्रार नोंदवली. Mumbai Crime Branch ने मोबाईल नंबर वरून त्याचा शोध घेतला.त्याच्या मोबाईलचं लोकेशन कमान भागातील होते.

पोलिसांना घटनास्थळी पोहचल्यानंतर एक उग्र वास जाणवला. दरवाज्यावर एक नोटीस लिहली होती. ज्यात घर carbon monoxide ने भरलेलं आहे. कोणताही दिवा लावल्यास स्फोट होईल असं लिहलं होतं.

नायगाव पोलिसांनी गांभीर्य ओळखत तातडीने फायर ब्रिग्रेडला पाचारण केले. PPE आणि श्वसन उपकरणांनी सुसज्ज असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी हायड्रॉलिक स्प्रेडर कटरचा वापर करून बेडरूममध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. ही आत्महत्या ही काळजीपूर्वक नियोजित आत्महत्या असल्याचं आढळून आलं आहे. Mumbai Coastal Road Suicide: वरळी येथील कोस्टल रोडवरून समुद्रात उडी मारून 30 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील पहिलीच घटना .

अग्रवालने दोन कार्बन मोनोऑक्साइड सिलिंडर त्याच्या हाताला लावले होते आणि त्याने हेल्मेट घातले होते. सिलिंडरला जोडलेल्या एका ट्यूबमध्ये नेब्युलायझर बसवले होते, ज्याचा वापर तो प्राणघातक वायू श्वास घेण्यासाठी करत होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी काळजीपूर्वक त्याच्या तोंडातून ती ट्यूब काढली आणि सिलिंडरपासून वेगळी केली. अग्रवालचे शरीर स्पष्टपणे सुजलेले होते.

श्रेय अग्रवालची सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये हा निर्णय त्याने आजारपणाच्या असह्य ओझ्यातून घेतल्याचं म्हटलं आहे. त्याच्या मानसिक स्थितीची आणि त्याच्या आजाराच्या विशिष्ट स्वरूपाची सखोल माहिती मिळविण्यासाठी त्याची तपासणी करत आहेत.

नायगाव पोलिसांनी चिठ्ठी आणि मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवला आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवासी आत्महत्येच्या असामान्य पद्धतीमुळे हैराण आणि गोंधळात पडले आहेत.

Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers:

Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.