Mumbai Coastal Road Suicide: वरळी येथील कोस्टल रोडवरून समुद्रात उडी मारून 30 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील पहिलीच घटना

नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील अशा प्रकारची ही पहिलीच दुर्दैवी घटना आहे. प्राप्त माहितीनुसार, ही घटना 18 मार्च रोजी संध्याकाळी 7:45 वाजता घडली आणि बुधवारी सकाळी 7:10 वाजता त्याचा मृतदेह सी लिंक लँडिंग पॉइंट रिजखाली आढळला.

Mumbai Coastal Road Suicide: वरळी येथील कोस्टल रोडवरून समुद्रात उडी मारून 30 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील पहिलीच घटना
Mumbai Coastal Road Suicide (फोटो सौजन्य - Edited Image)

Mumbai Coastal Road Suicide: मुंबईमधून (Mumbai) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंगळवारी वरळी येथील कोस्टल रोड (Coastal Road) वरून उडी मारून एका 30 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या (Suicide) केली. नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील अशा प्रकारची ही पहिलीच दुर्दैवी घटना आहे. प्राप्त माहितीनुसार, ही घटना 18 मार्च रोजी संध्याकाळी 7:45 वाजता घडली आणि बुधवारी सकाळी 7:10 वाजता त्याचा मृतदेह सी लिंक लँडिंग पॉइंट रिजखाली आढळला. कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी मृत व्यक्ती त्याच्या स्वतःच्या गाडीने कोस्टल रोडवर आला. तो रस्त्यावर थांबला. नंतर त्याने गाडीचा इंडिकेटर चालू केले. त्याने गाडीत बसून सुमारे दोन मिनिटे वाट पाहिली. त्याने त्याचा मोबाईल फोन गाडीतच सोडला आणि नंतर समुद्रात उडी मारली. त्याचं रात्री तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली, परंतु दृश्यमानता कमी असल्याने आणि प्रकाशाचा अभाव असल्याने मृतदेह सापडला नाही. (हेही वाचा - Mumbai: आईने अभ्यास करायला सांगितल्याने 14 वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या; भांडूपमधील घटना)

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक कोळी रहिवाशांनी मृतदेह पुलाखाली तरंगताना पाहिला. त्यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाने तरुणाचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी मोबाईल फोनद्वारे त्याच्या कुटुंबाचा शोध घेतला आणि तो मालाड परिसरात राहत असल्याची पुष्टी केली. (हेही वाचा - Nagpur Teen Suicide Case: 'मृत्यूनंतर काय?' च्या कुतूहलामध्ये 12वी च्या विद्यार्थीनीने गमावला जीव; हातावर, गळ्यावर ब्लेडचे वार)

तथापि, एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शरीरावर कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्या व्यवसायाबद्दल किंवा इतर वैयक्तिक माहिती गोळा करता आली नाही. आम्ही अपघाती मृत्यू अहवाल (ADR) दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी करत आहोत.

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक: Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2025 09:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).