नागपूर (Nagpur) मध्ये गूगल (Google) वर 'मृत्यू नंतर काय?' या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या कुतुहलामधून एका 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान मृत मुलगी इयत्ता 12वीची विद्यार्थिनी आहे. या मुलीचे पालक नागपूरच्या आरबीआय मध्ये रिजनल डिरेक्टर पदावर काम करत आहेत. ही मुलगी खाजगी शाळेत शिकत होती आणि अनेकदा ती मृत्यू आणि परदेशी संस्कृती बद्दल ऑनलाईन सर्च करत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने ऑनलाईन 'stone blade knife'मागवला होता. पहिल्यांदा तिने हातात मनगटावर क्रॉस मार्क केला होता. त्यानंतर तिने गळा चिरला आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला.
सोमवारी संध्याकाळी छत्रपती नगर मध्ये संध्याकाळी 5.45 च्या सुमारास मुलीच्या आईला ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मुलीचा फोन ताब्यात घेतला तेव्हा त्यांना त्यामध्ये 'मृत्यूनंतर काय होतं?' याबद्दल सर्च केल्याची माहिती दिसली. असे धनतोळी पोलिस स्टेशन कडून सांगण्यात आले आहे. तिच्या डायरी मध्येही foreign cultures बद्दल काही माहिती सविस्तर लिहल्याचं आढळलं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार त्यांनी मुलीला विशेषतः युरोपियन कल्चरची ओढ असल्याचं आढळलं आहे. ती मृत्यू बद्दल काही गोष्टी शोधत असल्याचं दिसलं आहे. यामुळे ती आत्महत्येच्य विचारात खूप आधी पासून असल्याचं दिसत आहे. नक्की वाचा: Kubra Aykut Dies by Suicide: स्वतःशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय तुर्किश टिकटॉक स्टार कुब्रा आयकुटने केली आत्महत्या; 5 व्या मजल्यावरून मारली उडी .
मुलगी तिच्या घराच्या तळमजल्यावर तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती, तर पहिल्या मजल्यावर तिच्या काकाचे कुटुंब आणि आजी राहत होती. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers: Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.