Mumbai: आईने अभ्यास करायला सांगितल्याने 14 वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या; भांडूपमधील घटना

ही घटना रुणवाल ग्रीन्स इमारतीत घडली असून, भांडुप पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी रात्री 10.15 च्या सुमारास, 9 वी वर्गात शिकणाऱ्या मुलाने त्याच्या बेडरूममध्ये नायलॉनच्या दोरीचा वापर करून पंख्याला लटकून गळफास घेतला.

Mumbai: आईने अभ्यास करायला सांगितल्याने 14 वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या; भांडूपमधील घटना
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

मुंबईच्या (Mumbai) भांडुपमधील (Bhandup) एका 14 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची बाब समोर आली आहे. आईने अभ्यास करण्यास सांगितल्यानंतर या मुलाने आत्महत्या केली. रविवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली. ही घटना रुणवाल ग्रीन्स इमारतीत घडली असून, भांडुप पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी रात्री 10.15 च्या सुमारास, 9 वी वर्गात शिकणाऱ्या मुलाने त्याच्या बेडरूममध्ये नायलॉनच्या दोरीचा वापर करून पंख्याला लटकून गळफास घेतला.

बेडरूमचा दरवाजा उघडल्यानंतर त्याच्या आईला हे दृश्य दिसले. त्यानंतर मुलाला ताबडतोब फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, तेथे रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. तपास करण्यासाठी आणि प्रकरणाचा तपशील गोळा करण्यासाठी पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. आईने वारंवार अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितल्याने मुलाने हे कठोर पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक चौकशीत अंदाज आहे.

पोलिसांनी सांगितले की, मुलाचे वडील व्यापारी आहेत, तर आई गृहिणी आहे. दरम्यान याआधी ठाण्यामध्ये एका 15 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली होती. मुलगी फोनवर जास्त वेळ व्यतीत करत होती, याबाबत आईने रागे भरल्यानंतर मुलीने विष प्राशन केले. विष प्राशन केल्यानंतर मुलीची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Chennai: कामाच्या दबावामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या आत्महत्या, चैन्नई येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ परिसरात राहणाऱ्या तरुणीने 26 सप्टेंबर रोजी उंदीर मारण्याचे विष प्राशन केले होते. यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीची प्रकृती चिंताजनक होती व 2 ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी शनिवारी अपघाती मृत्यूची नोंद केली.

Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers: Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.

(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2024 10:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).