Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Chennai: चेन्नई येथील जुन्या महाबलीपुरम येथे एका सॉफ्टवेअर अभियंत्याने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. अभियंत्याने स्वत: ला विद्युत शॉक देऊन जीवनयात्रा संपवली आहे. कामाच्या तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका तरुणीने देखील कामाच्या तणावामुळे आत्महत्या केली. (हेही वाचा- कल्याण मध्ये 13 वर्षीय मुलाने आत्महत्या करत जीवन संपवलं; सुसाईड नोट मध्ये शिक्षिका, वर्ग मित्राने चिडवल्याचा उल्लेख)

मिळालेल्या माहितीनुसार, महाबलीपूरम रोड जवळ असलेल्या थाझंबूर येथील राहत्या घरात त्याने आत्महत्या केली. कार्तिकेयन असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो सॉफ्टवेअर फर्ममध्ये गेल्या १४ वर्षापासून नोकरीला होता. तो त्याची पत्नी जयरानी आणि दोन मुलांसोबत राहत होता. कामाच्या दबावामुळे नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

घरी कोणी नसताना त्याने आत्महत्या केली.जयराणी तिच्या मैत्रिणीसोबत थिरुनल्लारू मंदिराकडे गेली होती. कार्तिकेयन घरी एकटा होता. त्याने दरवाजा आतून बंद केला होता. जयराणी घरी परतली तेव्हा तीनं दरवाजा ठोठावला त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने तीने दरवाजा उघडण्यासाठी दुसरी चावी वापरली. दरवाजा उघडला तेव्हा कार्तिकेयन बेशुध्द अवस्थेत पडून होता. तो तारामध्ये गुंडाळून होता.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. रुग्णालयात दाखल केले. पंरतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असा संशय व्यक्त केला जात आहे. कार्तिकेयनच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे.