मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) शनिवारी एनआयएच्या विशेष कोर्टासमोर हजर झाल्या नसल्याची माहिती समोर येत आहे. एका महिन्यात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा प्रज्ञा ठाकूर तारखेला कोर्टात हजर झाल्या नाहीत. शुक्रवारी त्यांना दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांना न्यायालयात येता आले नाही, असे ठाकूर यांच्या वकिलांनी सांगितले आहे. दरम्यान, कोर्टात पाच आरोपी हजर होते. परंतु, अन्य दोन आरोपींच्या अनुपस्थितीवर न्यायाधीश पीआर शित्रे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कोर्टाने सर्व सातही आरोपींना 4 जानेवारीला हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या लॉकडाऊननंतर गेल्या महिन्यापासून न्यायालयात नियमित कामकाज सुरू झाले असून कोर्टाने या प्रकरणातील सात आरोपींना 3 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु, ठाकूर यांच्यासह बहुतांश आरोपी साथीच्या परिस्थितीचे कारण देत न्यायालयात हजर झाले नाहीत. यानंतर कोर्टाने त्यांना 19 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले. हे देखील वाचा- Chandrakant Patil On Shiv Sena: शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका
खासदारांच्या वतीने बाजू मांडणारे वकील जेपी मिश्रा म्हणाले, ठाकूर यांच्यावर एप्रिलपासून दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. ती तेथे तपासणीसाठी गेली आणि तिचा वैद्यकीय तपासणी अहवाल पाहून डॉक्टरांच्या सूचनेनुसार शुक्रवारी तिला दाखल करावे लागले.
29 सप्टेंबर 2008 रोजी उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे मशिदीजवळ मोटारसायकलला बांधलेल्या बॉम्बस्फोटात कमीतकमी 6 लोक ठार झाले होते. तर, 100 हून अधिक जखमी झाले आहेत.