Chandrakant Patil, Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस अधिक महत्व घेत आहे. तर, काँग्रेस पक्ष असून नसल्यासारखा आहे. याशिवाय शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या  वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. आदिवासी आणि दलित विकासासाठी लागणारा निधी देण्याची विनंती पत्राद्वारे केली. यावरही चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे .ही कुठे तरी वादाची सुरुवात आहे, असे मला वाटत नाही. हवे ते मिळवण्यासाठी नाराजी व्यक्त करायची आणि मिळाले की नाराजी दूर करायची, हा त्यांचा पॅटर्न आहे. मात्र, पहिल्यांदाच सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे पुढे काय ते पहावे लागेल? असेही चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होते. हे देखील वाचा- Sanjay Raut On Metro Carshed: कोर्टाने काहीही आदेश देऊ द्या, मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार- संजय राऊत

दरम्यान, दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी काही दिवसांपूर्वी अजना स्पर्धा आयोजित केले होते. या मुद्द्यावरून विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शिवसेना हा आता बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष राहिला नाही. शिवसेनेने आता हिंदुत्व सोडले आहे. आता ती सुडो सेक्युलर झाली आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केली होती. तसेच शिवसेना मतपेटीचे राजकारण करते आहे असाही आरोप त्यांनी त्यावेळी केला होता.

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका येत्या 15 जानेवारीत होणार आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्ष विरोधकांच्या टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे दिसत आहेत. शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवविण्याची घोषणा केली आहे. तर भाजपने स्वबळाचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काळात या राजकीय जुळवाजुळवीला वेग येणार आहे.