Shiv Sena | (File Photo)

माहिमचे शिवसेना (Shiv Sena) आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहेत. माहिममधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची एक बैठक शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत अत्यंत आक्रमक दिसले. माहिममधील शिवसेना (Mahim Shiv Sena) अभेद्य आहे. गद्दारांना गाढून शिवसेना भगवा फडकवेल असे विनायक राऊत या वेळी म्हणाले. सदा सरवणकर हे मुंबई शिवसेनेतील खूप जुणे नाव आहे. हेच सदा सरवणकर आता शिंदे यांच्या गोटात सामिल झाल्याने शिवसैनिक आक्रमक आहेत.

मुंबईतील शिवसैनिकांनी सदा सरवणकर यांच्या विरोधात जोरदार आक्रमकता दर्शवली आहे. अनेक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी सदा सरवणकर यांच्या फोटोवर 'गद्दार' असे लिहिले आहे. शिवसेनेच्या शाखांमध्येही मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. मुंबईतील शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या अनेक नेत्यांच्या बैठका पार पडत आहेत. विनायक राऊत यांनीही या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेत शिवसेना अद्यापही मजबुत असल्याचे म्हटले. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: शिवसेना मविआतून बाहेर पडणार? संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?)

दरम्यान, संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते की, आमदारांनी मुंबईत येऊन जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली तर मविआतून बाहेर पडायला शिवसेना तयार आहे. याबाबत विनायक राऊत यांना विचारले असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर आपण काहीही बोलणार नाही. त्यांनी जर एखादे वक्यव्य केले असेल तर सहाजिकच विचार करुन केले असेल, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.