Maharashtra Power Cut: राज्यातील शहरी भागापासून गावखेड्यांपर्यत विज येते ती महावितरणाची. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही संपूर्ण महाराष्ट्राला विज वितरण करते. राज्य सरकारच्या सुचनाप्रमाणे महावितरणांचं काम चालत. पण आता या महावितरणाचं खासगीकरणं केल्या जाणार आहे. हो म्हणजे ज्याप्रमाणे मुंबईतील काही भागात अदाणी पावर खासगी विजवितरकांमार्फत वीज पुरवल्या जाते आता त्याच प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात अदाणीचं विज पुरवतील. म्हणजे वीज वितरक महावितरणचं असेल पण महावितरणाचे खासगीकरण केल्या जाईल. तरी महावितरणाच्या खासगीकरणास महावितरण कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. किंबहुना सरकारकडे या विषयी मागणी केली आहे. पण सरकारने आवश्यक तो निर्णय न घेतल्याने आज महावितरण कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तरी आजपासून ३ दिवस म्हणजे ४ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान संप असणार आहे. तरी कर्मचारी कामावर नसल्याने राज्यातील विविध भागात वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे.
अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा राज्य सरकारवर आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली आहे. (हे ही वाचा:- Maharashtra: महावितरणचे कर्मचारी 4 जानेवारीपासून 3 दिवस संपावर, सरकारच्या कथित खाजगीकरणाच्या विरोधात पुकारले बंड)
तरी राज्यातील काही भागात वीज पुरवठा बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.