Coronavirus in India (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2 हजार 361 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 70 हजार 13 वर पोहचली आहे. यापैकी 30 हजार 108 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात चौथ्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. तसेच लॉकडाउनचा पाचवा टप्पा 30  जूनपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 1 लाख 90 हजार 535 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 5 हजार 394 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 91 हजार 819 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

एएनआयचे ट्वीट-

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बदल दिसून न आल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. देशात कोरोनाबाधितांसह कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.