मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून दरवर्षी तापमानाचा पारा वाढायला सुरुवात होते, होळी (Holi 2020) पर्यंत तर दिवसभराचे तापमान चांगलंच तापलेलं असतं मात्र यंदा दोन तीन दिवसांपासुन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. संध्याकाळ पासून ते पहाटे पर्यंत गार वारा वाहत असतो, एकूणच काय तर यंदा उन्हाळा थोडाच लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात (Vidarbha) उन्हाळा स्किप करून थेट पावसाळ्याचेच आगमन होतेय की काय अशी स्थिती आहे. अरबी समुदतीतील वादळी वाऱ्यांमुळे येत्या दोन दिवसात म्हणजेच 10 आणि 12 मार्च च्या दरम्यान विदर्भात पावसाची (Monsoon) शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मध्ये प्रदेश आणि राजस्थान भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, तर अरबी समुद्रातही वादळी वारे वाहताना दिसून येत आहेत, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतेय. यातही मराठवाडा आणि विदर्भात तापमान उतरलेलं आहे, परिणामी या भागात वादळी वाऱ्यांच्या सहित गारपीटांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.(हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन)
दरम्यान, मुंबई मध्ये आज 25 डिग्री तापमान आहे, तर मराठवाडा येथे मागील काही दिवसात सकाळी 34 डिग्री ते रात्रीपर्यंत 21 डिग्री अशाप्रकारचे चढउतार तापमानात पाहायला मिळते. सध्या देशावर ओढवलेल्या कोरोना संकटात वातावरणही बिघडल्यास आजार पसरण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.