मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Photo Credits-ANI)

चीन मधील वुहान (Wuhan) शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसचे (Coronavirus) जाळे आता जगभरात परसले आहे. तर कोरोनामुळे मृतांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून नवी प्रकरणे सुद्धा समोर येत आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना आता भारतात येण्यास बंदी घातली असून विमानतळावर थर्मल स्क्रिनींगद्वारे त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तर मुंबईत 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सकाळी विधानसभेत म्हटले होते. कोरोना व्हायरस महाराष्ट्रात शिरकाव करु पाहत असल्याने याच पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जायची काही गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच नागरिकांनी मास्क लावण्याची काही गरज नाही असे ही पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना असे म्हटले आहे की, येत्या पुढील चार-पाच दिवसात होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारीच होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करु नये असे आवाहन नागरिकांना केले होते. या आवाहनाचे पालन महाराष्ट्रातील नागरिकांनी सुद्धा करावे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अनावश्यक ठिकाणी गर्दी करु नका आणि पुढील 10-15 कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी घाबरुन जाऊ नका असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.(महाराष्ट्र मध्ये Coronavirus ची लागण झालेले रूग्ण नाहीत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन)

तसेच कोरोना व्हारसच्या भीतीपोटी नागरिक मास्क घालून फिरत आहेत. मात्र आता हे मास्क घालण्याची काहीही गरज नाही आहे. कारण नागरिक जे N95 मास्क फक्त डॉक्टर्ससाठी आहेत. कारण कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची तपासणी करण्याठी सुरक्षिततेच्या दृष्टीने घालावा लागतो. मात्र रुग्णांना साधा मास्क दिला जातो. तसेच एखाद्या व्यक्तीसोबत हात मिळवणे टाळा आणि संवाद साधताना एकमेकांपासून 3 फीट अंतरावर उभे राहून बोला असे ही सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल त्याला कोरोना व्हायरसबाबत भीती बाळगण्याची गरज नाही.