Maharashtra Weather Forecast: ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यांसह विदर्भात पुढील चार दिवस पर्जन्यवृष्टीचा इशारा
Rains | (Photo Credits: ANI)

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात (Vidarbha) पुन्हा एकदा पावसाचा अंदाज (Weather Forecast) वर्तविण्यात आला आहे. प्रामुख्याने ठाणे (Thane), पुणे (Pune) आणि सातारा जिल्ह्यात तर कोकणातील रायगड (Raigad) जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पाऊस (Rain) होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात आभाळ भरुन आले असून रिमझिम पावसास सुरुवात झाली आहे. हा पाऊस पुढील चार दिवस जोर धरेल असा अंदाज आहे.

हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणातील काही जिल्ह्यांना 2 ऑगस्टपर्यंत आगोदरच यलो अलर्ट दिला आहे. हा अलर्ट ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना लागू आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना 31 ऑगस्ट रोजी यलो अलर्ट आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांन 1 ऑगस्टला यलो अलर्ट जारी करण्या आला आहे. दरम्यान, आयएमडीचे के एस होसाळीकर यांनी ट्विटरद्वारे माहिती देताना म्हटले आहे की, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांमध्ये पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Forecast: राज्यातील 'या' जिल्ह्यांना 4 दिवस सतर्कतेचा इशारा- IMD)

ट्विट

राज्यात यंदा मुसळधार पावासाने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महापूर आले, शहरे, गावे पाण्यात गेली. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. संसार उद्ध्वस्त झाले. लोक मारले गेले. अनेक जखमी झाले. शेतकरी, व्यापारी यांचे प्रचंड नुकसान झाले. या सर्व नुकसानिची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री आणि विरोधी पक्षनेते पाहणी करत आहेत. प्रशासनही या नुकसानिचा अद्याप आढावा घेत आहे. इतके सगळे नुकसान झाल्यावर पुन्हा एकदा पावसाचा इशारा मिळाल्याने नागरिक घाबरलेले नागरिक अधिकच गंभीर झाले आहेत.