Heavy Raining | Representational image (Photo Credits: pxhere)

मुंबई सह महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाचं जोरदार धुमशान सुरू आहे. अचानक येणार्‍या वादळी वारा, पाऊस आणि सोबतच वीजांचा कडकडाट मुळे मे महिन्यातच पावसांच्या दिवसांचा अनुभव मिळत आहे. यामध्येच आता सायक्लॉन शक्ती मुळे सध्या अरबी समुद्रामध्ये ECMWF मॉडेल च्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा समुद्र किनारी भागाजवळ राहणार आहे. त्यामुळे विकेंडला  किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. 23 आणि 24 मे दिवशी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून 23-24 मे साठी रायगडला रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे ऑरेंज अलर्ट वर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सायक्लॉन शक्ती मुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

रायगड रेड अलर्ट वर

आयएमडीच्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व हालचालींना चालना मिळण्यासाठी पुरक वातावरण आहे. अरबी समुद्रात निर्माण होणारी low-pressure system आता कमी दाबाच्या पट्ट्यात तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

TOI च्या वृत्तानुसार, आयएमडी मुंबईच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, "उत्तर कर्नाटक-गोवा किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर चक्राकार वाऱ्याचे प्रमाण कायम आहे. त्याच्या प्रभावाखाली 12 तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि पुढील 36 तासांत ते कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होऊ शकते."

मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात मे महिन्यातील 100 मिमी पावसाचा टप्पा आधीच ओलांडला आहे, आणि मान्सून अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वी आणखी काही दिवस पावसाळी राहण्याची शक्यता आहे.