Maharashtra Weather Forecast: पुढील 4-5 दिवस राज्याला मुसळधार पावसाचा IMD चा इशारा
Rainfall | Image used for representational purpose | (Photo Credits: @NarimanPatel/ Twitter)

राज्यात पुढील 4-5 दिवस वीजांच्या गडगडाटासहीत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याकडून विविध जिल्ह्यासाठी अलर्टही जारी करण्यात आले आहेत. यासंदर्भातील माहिती हवामान विभागाने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (Thane: दिव्यामध्ये इमारतीवर वीज कोसळून एकाचा मृत्यू, गणेश नगर परिसरात घडली घटना)

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना 7 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड , धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.

पहा ट्विट:

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांसाठी 9 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, अहमदगनर, उस्मानाबाद, नाशिक, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना 10 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट असेल. 11 ऑक्टोबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट असेल.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुन्हा एकदा मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे परतीचा पाऊसही रेंगाळणार असल्याची माहिती के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.