Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

नोव्हेंबर महिन्यात राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातल्याने बळीराजासह अनेकाचे नुकसान हे केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतीपिकाचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. असे असतानाच हवामान खात्याने (Weather Alert) पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे.  येत्या 48 तासांत राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसासह (Maharashtra Rain Update) गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  (हेही वाचा - Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर होणार कारवाई; पोलिसांना मिळाली इंटरसेप्टर वाहने)

राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे नागपूर विभागातही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह पुणे विभागाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ठाण्यालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.