Amphotericin B Emulsion Injections | Photo Credits: Twitter/ Nitin Gadkari Office

महाराष्ट्रच्या वर्धा मधील Genetic Life Sciences मध्ये गुरूवारी (27 मे) Amphotericin B Emulsion injections ची निर्मिती सुरू झाली आहे. हे औषध Mucormycosis किंवा Black Fungus या जीवघेण्या आजारावर वापरलं जात आहे. Mucormycosis हा आजार ब्लॅक फंगस अर्थात काळी बुरशी म्हणून ओळखला जात आहे. हा कोविड 19 वर मात केल्यानंतर काही रूग्णांमध्ये आढळत आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाच्या ट्वीटर अकाऊंट वरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हे औषध निर्माण करणारी सध्या एकमेव कंपनी होती तिच्याकडून 7000 रूपयांना औषध मिळत होते आता ते 1200 ला मिळणं शक्य आहे.

नितीन गडकरी कार्यालय ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना सध्या भारतातील परिस्थिती पाहता जगातून येथून शक्य होईल ती औषधं आणि इतर मदत गोळा करण्याचे आदेश आहेत. भारत या औषधाचा साठा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेच्या Gilead Sciences कडून ही मदत मिळाल्याची माहिती सूत्रांनी ANI ला दिली आहे. नक्की वाचा: Black Fungus वर उपचारासाठी Amphotericin-B Anti Fungal औषधाच्या उत्पादनासाठी 5 अतिरिक्त उत्पादकांना सरकार कडून परवाना.

Mucormycosis हा जीवघेणा आजार आहे. अनियंत्रित मधुमेह, steroids चा बेबंद वापर, खूप काळ आयसीयू मध्ये राहणारे रूग्ण अशांना या काळ्या बुरशीचा धोका अधिक असल्याचं आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. देशात सध्या गुजरात, महाराष्ट्रात याचे रूग्ण अधिक आहेत. रूग्णांच्या तुलनेत आता औषध पुरवठा कमी पडू नये म्हणून सरकार कडून औषध निर्मिती आणि उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. येत्या सोमवार पासून या औषधाच्या वायल्स 7000 ऐवजी 1200 रूपयांत उपलब्ध करण्याचं काम सुरू होणार आहे.