श्रीपाद छिंदम (Archived, edited, images)

मागील कित्येक शतकांपासून अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान म्ह्णून छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati ShivajI Maharaj) यांच्याकडे पहिले जाते. केवळ राज्यातच नव्हे तर देशविदेशात शिवजयंती (Shivjayanti) सारखे उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात यावरूनच महाराजांच्या कर्तृत्वाचा अंदाज येतो. यामुळे साहजिकच महाराष्ट्राची जनता शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढणाऱ्याला माफ करणार नाही हे स्पष्ट आहे, याचा प्रत्यय नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Elections)  देखील आला. अहमदनगर (Ahmednagar)  मतदारसंघातील बहुजन समाजवादी पक्षाचा उमेदवार श्रीपाद छिंदम (Shripad Chindam) याला केवळ 2  हजार 983 मते पडल्याने त्याचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे. छिंदम याने काही काळापूर्वी एका फोनचा संभाषणात शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना चुकीच्या भाषेचा वापर केल्याचे सिद्ध झाले होते, ज्यावरून त्याला तडीपार सुद्धा करण्यात आले होते.

श्रीपाद छिंदम यांनी भाजपाचे नेते असताना हा सर्व प्रकार झाला होता, ज्यामुळे भाजपाने सुद्धा छिंदमची हकालपट्टी केली होती, मात्र तरीही अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत 900 हुन अधिक मताधिक्याने त्याचा विजय झाला होता, यंदा मात्र यंदा बसपा कडून छिंदम याला तिकीट देत उमेदवारी देण्यात आली. तरीही निश्चितच अहमदनगरकरांनी त्यांना आपला हिसका दाखवून दिला.

श्रीपाद छिंदम अहमदनगमधून तडीपार; छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढले होते अनुद्गार

प्राप्त माहितीनुसार अहमदनगर शहर मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार, संग्राम जगताप यांना जनतेचा कौल प्राप्त झाला आहे. तब्बल 81 हजारहुन अधिक मते मिळवत जगताप यांचा विजय झाला आहे तर त्यांच्या विरोधी दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे अनिल राठोड यांना 70 हजार मते मिळवता आली आहेत.

दरम्यान, अहमदनगर येथे भाजपाला धक्का देत राष्ट्रवादीने 12 पैकी तब्बल 7 जागा मिळवल्या आहेत. यंदाच्या निवडणूक निकालांनंतर भाजपाला सर्वाधिक मते मिळूनही मुख्यमंत्री पदाच्या बाबत कोणतीही ठोस भूमिका अद्याप समोर आलेली नाही. एकीकडे महायुती मधील अंतरिम वाद आणि दुसरीकडे शिवसेना आणि महाआघाडीच्या युती होण्याच्या चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात रंजक वळणे पाहायला मिळत आहेत.