CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

2019 च्या निवडणूक निकालाच्या वेळेस शिवसेना भाजपा च्या बाजूने मतदारांनी कौल दिला होता मात्र मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या अंतर्गत वादामधून महाविकास आघाडी ने जन्म घेतला आणि बघता बघता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वळणं आली. शिवसेना आणि एनसीपी पक्ष फूटले. यामध्ये शिवसेना पक्षात मूळ शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले तर उद्धव ठाकरे यांना उबाठा शिवसेना असं नाव देण्यात आले होते. पक्ष फूटीनंतर विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्याला साथ दिलेल्या आमदारांचं राजकीय भविष्य धोक्यात येणार नाही याची जबाबदारी स्वीकार्ली होती. त्यामुळे आता निकाला मध्ये एकनाथ शिंदे यांना साथ दिलेल्या 39 जणांच्या कामगिरी कडे सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांना साथ दिलेले 39 आमदार कोण होते?

  1. जळगाव ग्रामिण - गुलाबराव पाटील
  2. एरंडोल - चिमणराव पाटील
  3. पाचोरा - किशोर पाटील
  4. मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील
  5. चांदिवली - दिलीप लांडे
  6. कुर्ला - मंगेश कुडाळकर
  7. माहिम - सदा सरवणकर
  8. भायखळा - यामिनी जाधव
  9. कर्जत - महेंद्र थोरवे
  10. अलिबाग- महेंद्र हरी दळवी
  11. महाड- भरतशेठ मारुती गोगावले
  12. उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले
  13. परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत
  14. सांगोला- शहाजी बापू पाटील
  15. कोरेगाव- महेश शिंदे
  16. पाटण- शंभूराज देसाई
  17. दापोली- योगेश कदम
  18. रत्नागिरी- उदय सामंत
  19. सावंतवाडी- दीपक केसरकर
  20. राधानगरी- प्रकाश आबिटकर
  21. बुलढाणा - संजय गायकवाड मेहकर
  22. दर्यापूर - अभिजित अडसूळ
  23. रामटेक - आशिष जैस्वाल
  24. भंडारा - नरेंद्र भोंडेकर
  25. दिग्रस - संजय राठोड
  26. नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर
  27. कळमनुरू - संतोष बांगर
  28. जालना - अर्जून खोतकर
  29. सिल्लोड - अब्दुल सत्तार
  30. खानापुर- अनिल बाबर
  31. छत्रपती संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल
  32. छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) - संजय शिरसाट
  33. पैठण - संदिपान भूमरे
  34. वैजापूर - रमेश बोरनारे
  35. नांदगाव - सुहास कांदे
  36. मालेगाव बाह्य - दादाजी भुसे
  37. ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक
  38. मागाठाणे - प्रकाश सुर्वे

दरम्यान एकनाथ शिंदेंना बंडामध्ये साथ दिली मात्र तिकीट न  मिळालेले उमेदवार केवळ श्रीनिवास वनगा आहेत. त्यांच्या देखील नाराजी नाट्यानंतर शिंदेंनी विधान परिषदे मध्ये संधी दिली जाईल असं म्हटलं आहे. तर या बंडामधील संदिपान भुमरे यांनी खासरादकी जिंकल्यानंतर त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले आहे तर अनिल बाबर यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला तिकीट दिले आहे. चिमणराव पाटील यांचा मुलगा आमो पाटील यांना देखील शिंदेंनी तिकीट दिले आहे.

शिवसेनेमध्ये बंडाच्या वेळेस शिंदेंना साथ देणारे सध्या विजयाकडे कूच करत आहेत. माहिम मध्ये सदा सरवणकर यांना पोस्टल मध्ये अमित ठाकरेंनी टक्कर दिली तर नंतर उबाठा चे महेश सावंत आघाडीवर होते.