महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : मतदान करण्याच्या आवाहनासाठी रत्नागिरी च्या भाट्ये किनार्‍यावर साकारलं खास Sand Art!
Bhatye Beach | Photo Credits: Twitter

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर दिवशी 288 विधानसभा मतदार संघांमध्ये एकाच टप्प्यांत निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सारेच राजकीय पक्ष मतादारांकडे मतांचा जोगवा मागत आहे. मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी आता निवडणूक आयोगाकडूनही प्रयत्न करण्यात आले आहेत. रत्नागिरीच्या (  भाट्ये बीच वर खास सॅन्ड आर्ट (Sand Art) साकारण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: दापोली ते राजापूर चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या.

रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मतदार संघामध्ये पथानाट्य सादर करून जन जागृती करण्यात आली. त्यानंतर भाट्ये समुद्र किनार्‍याची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच भाट्ये समुद्रावर 21 ऑक्टोबर दिवशी मतदान करण्यासाठी बाहेर पडा या संदेशासोबतच 'स्वच्छता हीच सेवा' हा खास मेसेज लिहण्यात आला आहे.

भाट्ये बीचवरील सॅन्ड आर्ट

रत्नागिरी मध्ये दापोली (Dapoli), गुहाघर (Guhaghar), चिपळूण (Chiplun), राजापूर (Rajapur) आणि रत्नागिरी या 5 मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यात 21 ऑक्टोबर दिवशी मतदान पार पडेल तर 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी केल्यानंतर मतदारांचा कौल स्पष्ट होणार आहेत.