Maharashtra Unlock 4: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिम चालक, मालकांना दिलासा, म्हणाले 'सरकार सकारात्मक पण..'
Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडून राज्यातील व्यायाम करणारे नागरिक आणि जिम (Gym) चालक, मालकांना दिलासादायक संकेत मिळाले आहेत. जिम सुरु (Reopen Gym) करण्याबाबत राज्य सरकार अनुकुल आहे. मात्र, कोरोना व्हायरस संक्रमन वाढू नये. यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्वे सादर करावीत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जिम मालकांना केल्या आहेत. राज्यातील जिम चालक, मालकांनी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी या सूचना आणि संकेत दिले.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून राज्यातील जिम बंद आहेत. कोरना व्हायरस संसर्गाचा वाढता धोका विचारात घेऊन राज्य सरकारने जिम, मॉल्स, चित्रपटगृह, जलतरण तलाव, बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, अनलॉक सुरु झाल्यानंतर राज्य सरकारने अनेक गोष्टी सुरु करण्यास हळूहळू परवानगी दिली. मात्र, जीम सुरु करण्यास अद्यापही परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे राज्यातील जिम चालक, मालकांनी मुख्यमंत्र्याची आज भेट घेतली. (हेही वाचा, Maharashtra Unlock 4: नागरिकहो सज्ज राहा!, 1 सप्टेंबरपासून बदलू शकतात या गोष्टी)

जिम सुरु कराव्यात यासाठी जिम चालक, मालकांनी या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. या वेळी राज ठाकरे यांनी वाट बघत बसू नका...आवश्यक ती सर्व काळजी घेऊन जिम सुरु करा असा सल्ला जिम चालक, मालकांना दिला होता. मात्र, या भेटीनंतरही जिम बंदच होत्या.

दरम्यान, राज्यातील धार्मिक स्थळं सुरु करण्यात यावीत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक राजकीय पक्ष, संस्था संघटना याबाबत आक्रमक आहेत. परंतू, राज्य सरकारने अद्याप तरी मंदिर, मशित, चर्च, गुरुद्वारा अथवा इतर कोणतेही धार्मिक स्थळ सुरु करण्याबाबत सुतोवाच केले नाही.