Maharashtra Unlock 4: नागरिकहो सज्ज राहा!, 1 सप्टेंबरपासून बदलू शकतात या गोष्टी
Unlock | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा प्रादूर्भाव दूर ठेवण्यासाठी लागू करणयात आलेला लॉकडाऊन (Lockdown) हळूहळू उठवला जात आहे. आतापर्यंत संपूर्ण देशासह महाराष्ट्रात 3 वेळा लॉकडाऊन शिथिल करण्या आला आहे. ज्याला अनलॉक म्हणून संबोधण्यात आले. येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉक 4 (Maharashtra Unlock 4) सुरु होईल. अनलॉक 4 (Unlock 4) मध्ये बऱ्याच गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली जात असतानाच अनेक गोष्टींमध्ये बदलही केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना नव्या बदलांना सामोरे जाण्यास तयार राहावे लागणार आहे.

काय होऊ शकतात बदल?

एलपीजी सिलिंडर

सरकारने दिलेल्या संकेतानुसार अनलॉक 4 (Unlock 4) मध्ये एलपीजी सिलिंडर, महागडी विमान यात्रा, अनलॉक ४ ची सुरुवात, लोन मोरेटोरियम आणि जीएसटी भरणा यांमध्ये काही बदल होऊ शकतात. जसे की एलपीजी सिलिंडर दरांमध्ये वाढ होऊ शकतो. प्रतिमहिन्यात एक तारीख ही एलपीजी सिलिंडरसाठी महत्त्वाची ठरते. कारण या दिवशी एलपीजी दरांमध्ये बदल होतात.

विमानसेवा

येत्या 1 सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून वमानन सुरक्षा शुल्क (SSF) अधिक घेण्याबाबतचा निर्णय नागरी उड्डान मंत्रालयने घेतला आहे. त्यामुळे विमान प्रवास महागण्याची चिन्हे आहेत.

मेट्रो ट्रेन

अनलॉक 4 मध्ये केंद्र सरकार काही सेवा सुरु करण्यास प्राधान्य देऊ शकते. यात मेट्रो ट्रेनसारख्या सेवा सुरु होऊ शकतात. मेट्रो सेवा जरी सुरु झाली तरी, नागरिकांना सरकारने घालून दिलेल्या नियम, अटी, शर्ती पाळाव्या लागणार आहेत. (हेही वाचा, Coronavirus: 1 सप्टेंबरपासून 'Unlock 4' मध्ये सुरु होऊ शकतात 'या' प्रमुख गोष्टी)

जीएसटी

जे करदाते जीएसटी (GST) भराणा उशीरा करणार आहेत. त्यांना त्या भरणाचे एक सप्टेंबरपासून व्याज द्यावं लागणार आहे. सरकारने त्याबाबत नुकतीच घोषणा केली आहे.

कोरोना व्हायरस संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडाऊन लागू केला होता. 24 मार्च पासून देशभर लॉकडाऊन लागू झाला. तेव्हापासून आजतागायत लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या काही दिवासांपासून त्यात हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आतापर्यंत तिन वेळा अनलॉक करण्यात आले असून, येत्या 1 सप्टेंरला अनलॉक 4 बाबत नियम आणि अटी जाहीर केल्या जातील. अनलॉक 4 मध्ये काय सुरु होणार आणि काय बंद होणार याबाबत उत्सुकता आहे.