Coronavirus In Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसागणिक हजारोंच्या संख्येने वाढत असल्याचे प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहेत. याच दरम्यान आता आज राज्यात कोरोनाचे आणखी 8493 रुग्ण आढळून आले असून 228 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाखांच्या पार गेला आहे.(BMC: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 4 रुग्णांची नोंद; कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 2 हजार 672 वर)

राज्यात कोरोनाचे एकूण 6,04,358 पॉझिटिव्ह रुग्ण असून 4,28,514 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच आतापर्यंत 20,265 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सद्यच्या घडीला महाराष्ट्रात 1,55,268 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6,04,358 वर पोहचला आहे. तर कोरोनाच्या रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत कोविड योद्धे सुद्धा सध्याच्या संकट काळात आपले कर्तव्य चोखपणे बजावताना दिसून येत आहेत.(मुंबईत गेल्या आठवड्यात COVID19 च्या रुग्णांचा आकडा दुप्पटीने वाढला- BMC)

दरम्यान, राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनावर अद्याप ठोस लस उपलब्ध नसल्याने जगभरातील संशोधक त्या संदर्भात अभ्यास करत आहेत. तर राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट अधिक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे अनलॉकिंगनुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन एकत्रितपणे उठवण्यात येणार नाही. परंतु हळूहळू लॉकडाऊन उठवला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.