प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2020) राजपथावरील पथसंचलनात केंद्राने नाकालेला ‘स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग - कान्होजी आंग्रे’ हा महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Tableau) ठाकरे सरकारने (Thackeray Government) स्वीकारला आहे. 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुंबईमधील शिवाजी पार्क (Shivaji Park ) येथे होणाऱ्या पथसंचलनात या चित्ररथाची झलक दाखवण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 'ज्यांचे अश्वदल त्यांची पृथ्वी, अन् ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र', हे लक्षात घेऊन स्वराज्यासाठी प्रथम आरमार उभारले. या आरमार उभारणीत अनेक वीरांनी मोठे योगदान दिले. त्यापैकी एक म्हणजेच ‘कान्होजी आंग्रे’ (Kanhoji Angre). या चित्ररथातून स्वराज्याची सेवा करताना कान्होजींच्या नेतृत्वाखाली समुद्रामध्ये स्वराज्याचे तोरण कसे बांधले? तसेच शिवाजी महाराजांच्या आरमाराने इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्यावर समुद्रावरून कसे नियंत्रण ठेवले, याची शौर्यगाथा उलगडून सांगितली जाणार आहे. (वाचा - कोरेगाव भीमा प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये आणि खऱ्या गुन्हेगारांना संरक्षण मिळावे यासाठी एनआयएकडे तपास - शरद पवार)
कान्होजी आंग्रे यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या चित्ररथाची बांधणी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केली आहे. जहाजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यात आला आहे. तसेच कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची माहिती देणारा जिवंत देखावाही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सादर करण्यात येणार आहे.
यंदा केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या या चित्ररथाला परवानगी नाकारली. त्यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा राजपथावर दिसणार नसला तरी तो शिवाजी पार्क येथील संचलनात दिसणार आहे. ठाकरे सरकारने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत हा चित्ररथ स्वीकारला आहे.