मणिपूरमधल्या हिंसाचारात (Manipur Violence) अडकलेल्या महाराष्ट्रातल्या 25 विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश आले आहे. मणिपूरमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना इम्फाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात आलं आहे. मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला. तसेच, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली होती, त्यानंतर या विद्यार्थ्यांना मणिपूर इम्फाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले यांनंतर गुवाहटीवरुन त्यांना मुंबईला विशेष विमानाने आणण्यात आले.
#WATCH | Maharashtra: Stranded students were brought back to Mumbai from violence-hit Manipur. (08.05) pic.twitter.com/Q78s0IaqHr
— ANI (@ANI) May 8, 2023
या मुलांच्या स्वागतासाठी त्यांच्या पालकांसह भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते विमानतळावर आले होते. तसेच, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, राजशिष्टाचार अधिकारी अब्दुल अजीज बेग आणि त्यांच्या टीमने शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले.
मणिपूरमध्ये हिंसाचारात अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी मुंबईत सुखरुप परतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या विद्यार्थ्यांनी मुंबईत परतल्यावर आनंद व्यक्त केला आहे.