Jayant Patil Meets Governor Bhagat Singh Koshyari: बुलढाणा मधील जिगाव प्रकल्पासंदर्भात राज्यमंत्री जयंत पाटील यांनी घेतली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट
जयंत पाटील यांनी घेतली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट (Photo Credits-ANI)

Jayant Patil Meets Governor Bhagat Singh Koshyari: बुलढाणा (Buldhana) जिल्यातील जिगाव पाटबंधारे प्रकल्पाच्या अडचणी दूर करून तो लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. जयंत पाटील यांच्यासोबत राज्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, लोकप्रतिनिधी तसेच विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली.(Chandrakant Patil on CM Uddhav Thackeray: 'नाचता येईना अंगण वाकडे' म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्याच्या घरुन काम करण्याच्या स्पष्टीकरणावर टीका)

डॉ राजेंद्र शिंगणे यांनी राजमाता जिजाऊ व बाळराजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेले तैलचित्र राज्यपालांना भेट दिले. आपण लवकरच जिजामाता यांचे जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा येथे भेट देऊ असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.(Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक)

दरम्यान, 6 ऑगस्टला मंत्रालयात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीतील निर्णयानुसार जयंत पाटील यांनी राज्यपाल  भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे 4906 कोटी रुपयांच्या विषेष निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला होता. जिगाव प्रकल्पाकरिता मार्च 2020 च्या अखेर पर्यंत 4099 कोटी खर्च झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच प्रकल्पाच्या भूसंपादन आणि पुर्नवर्सनाच्या कामासाठी 2003 कोटी रुपये ही खर्चिक झाले. पण पुर्नवसनाच्या उर्वरित कामासाठी 4096 आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते.