SSC HSC Result | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ () द्वारे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल (Maharashtra Board Result 2025) केव्हा लागणार याबाबत शैक्षणिक वर्तुळात मोठी उत्सुकता असते. यंदाही ती कायम आहे. मात्र, यंदा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसह संपूर्ण शैक्षणिक वर्तुळास फार प्रतिक्षा करावी लागणार नाही. हे निकाल (SSC Result Date) यंदा अपेक्षेपेक्षा लवकर लागण्याची शक्यता आहे. राज्याचा शिक्षण विभाग त्या दृष्टीने काम करतो आहे. दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीसुद्धा आगोदरच स्पष्ट केले आहे की, यंदा या परीक्षांचे निकाल (HSC Result Date) 15 मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभाग गतीमान

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावी हे शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे वर्ष मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे निकाल जर वेळेत लागले तर, विद्यार्थ्यांना विविध शाखांना आणि अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे सोयीचे होते. हे निकाल उशीरा जाहीर झाले तर उर्वरीत बोर्डांचे निकाल तोवर जाहीर होऊन गेलेले असतात. सहाजिकच विविध शाखा आणि अभ्यासक्रम यांचे प्रवेश पूर्ण झाले असते. महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधींवर मोठी मर्यादा येते. ती टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने हे निकाल वेळेत जाहीर करावेत, अशी मागणी नेहमीच होते. त्यावर विचार करुन यंदाचे निकाल मे 2025 च्या मध्यावर लागण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, HSC Answer Sheets Burnt in Virar: इयत्ता 12 बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका जळाल्या; विरार येथील महिला शिक्षकाच्या घरास आग)

कॉपीमुक्त वातावरणात परीक्षेसाठी विशेष प्रयत्न

राज्य शिक्षण मंडळाने यंदा इयत्ता दहावी परीक्षांबाब अत्यंत पारदर्शी धोरण स्वीकारले होते. ज्यामुळे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यावर अधिक भर देण्यात आला. जसे की, ज्या शाळांवर परीक्षा केंद्र असतील त्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले नाही. याचाच अर्थ असा की, प्रत्येक परीक्षा केंद्रांवर वेगळ्या शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्यामध्ये केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचार्‍यांचा समावेश होता. प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या वर्षी राज्यभरातून सुमारे 31 लाख विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा दिली. या दोन्ही इयत्तेतील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालक, शिक्षकांना निकालाबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, HSC Answer Paper Kamothe: कामोठे बस स्टँड परिसरात सापडले एचएससी बोर्ड परिक्षा उत्तरपत्रिकांचा गठ्ठा)

विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांमुळेच गोंधळ

दरम्यान, राज्य सरकार आणि शिक्षण मंडळ यांनी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणयासाठी यंत्रणा तर खर्ची घातली. पण, प्रशासिय पातळीवर झालेल्या गोंधळाचे काय? असा सवाल उपस्थित होतो आहे. अलिकडेच एक शिक्षक महोदय बोर्ड परिक्षेच्या उत्तरपत्रिका चक्क एसटी महामंडळाच्या धावत्या बसमध्ये बसून प्रवासादरम्यान तपासत होते. दुसऱ्या बाजूला, विरार येथील एका घटनेत बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका घराला लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. सदर उत्तरपत्रिका एका शिक्षिकेने फेरतपासणीसाठी स्वत:च्या घरी आणल्या होत्या. आणखी एका अशाच घटनेत नवी मुंबई येथील कामोठे बस स्टँड परिसरात वाणिज्य शाखेच्या कोऱ्या उत्तरपत्रिका आढळून आल्या होत्या. ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.