Exam | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Maharashtra SET 2020 Answer Key: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (State Level Eligibility Test, SET 2020) परीक्षेसाठी अॅन्सर की जाहीर केली आहे. त्यामुळे परीक्षेच्या स्कोअरबद्दल जाणून घेण्यास उत्सुक उमेदवार अधिकृत पोर्टलला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. यासाठी उमेदवारांना setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx येथे भेट देऊन लॉग इन करावे लागेल. उमेदवार त्यांचे आवश्यक तपशील येथे प्रविष्ट केल्यानंतर त्यांचे निकाल तपासू शकतात. MH SET अॅन्सर की 29 जानेवारी, 2021 पर्यंत संध्याकाळी 6 वाजतेपर्यंत उपलब्ध असेल. या अॅन्सर की मध्ये सर्व संचातील योग्य उत्तरांची सूची देण्यात आली आहे.

दरम्यान, जर एखाद्या उमेदवाराला आपली उत्तरपत्रिका नीट तपासली गेली नाही असे वाटत असेल तर असे उमेदवार 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत हरकत घेऊ शकतात. 5 फेब्रुवारीनंतर कोणतेही तक्रार अर्ज स्विकारले जाणार नाहीत. (वाचा - JEE Main 2021: जेईई मुख्य परीक्षेच्या 2021 च्या पहिल्या टप्प्यातील अर्जाच्या प्रक्रियेसाठी उद्या शेवटची तारीख; jeemain.nta.nic.in वर लवकर करा Apply)

या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा -

  • महाराष्ट्र SET 2020 परीक्षा - 27 डिसेंबर 2020 ला पार पडली
  • MH SET प्रोविजनल अॅन्सर की - 22 जानेवारी 2021
  • अॅन्सर की च्या उपलब्धतेची शेवटची तारीख - 29 जानेवारी 2021
  • महाराष्ट्र सेट अॅन्सर की तक्रारी संदर्भातील तारीख - 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2021

Maharashtra SET Answer Key 2020: अॅन्सर की कशी तपासावी?

महाराष्ट्र एसईटी परीक्षेचे उत्तर तपासण्यासाठी सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट setexam.unipune.ac.in वर जावे लागेल. यानंतर, उमेदवारांनी MH SET अॅन्सर की 2020 या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्या प्रश्नपुस्तकानुसार सेट (ए / बी / सी / डी) निवडा. त्यानंतर आपल्यासमोर पीडीएफ स्वरुपात अॅन्सर की मिळेल. ही अॅन्सर की तुम्ही डाउनलोड करू शकता. याचा तुम्हाला भविष्यात उपयोग होईल.