महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मागील 24 तासांत राज्यात 56 हजार 286 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 276 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 32 लाख 29 हजार 547 वर (COVID-19 Cases) पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 57 हजार 28 वर (COVID-19 Death Cases) पोहोचला आहे. ही आकडेवारी पाहता राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. महाराष्ट्रात सद्य घडीला 26 लाख 49 हजार 757 (COVID-19 Active Cases) रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान राज्यात मागील 24 तासांत 36,130 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 5 लाख 21 हजार 317 रुग्णांनी (COVID-19 Recovered Cases) कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.हेदेखील वाचा- Remdesivir तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ.राजेश टोपे यांची उत्पादकांसोबत बैठक, दिले 'हे' महत्वाचे निर्देश
Maharashtra reports 56,286 new COVID cases, 36,130 recoveries, and 376 deaths in the last 24 hours
Total cases: 32,29,547
Active cases: 5,21,317
Total recoveries: 26,49,757
Death toll: 57,028 pic.twitter.com/0WGl7v84xy
— ANI (@ANI) April 8, 2021
आरोग्य विभागाने दिलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुण्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 6,19,091 इतकी आहे. त्यापाठोपाठ मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाच्या आणखी 8938 रुग्णांची भर पडली असून 23 जणांचा बळी, महापालिकेने माहिती दिली आहे. यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4,91,980 वर पोहोचली आहे.
दरम्यान कोरोनावरील लसीचा तुटवडा सध्या राज्यासह मुंबईत भासत चालल्याने आता शुक्रवार पासून लसीकरण थांबणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. PTI सोबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी असे म्हटले की, ज्या शहरात कोरोनाच्या लसीचे पुरेसे डोस आहेत तेथेच लसीकरण सुरु राहणार आहे. तर आज कोरोनाच्या लसीकरणाचा शेवटचा दिवस असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा स्पष्ट केले आहे.