Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maharashtra Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 18,390 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 20,206 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 9,36,554 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात एकूण 2,72,410 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 75.36% झाले आहे.

याशिवाय आज राज्यात 392 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 12,42,770 इतकी झाली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. (हेही वाचा -Sanjay Raut On Kangana Ranaut: बाबरी केस ते मराठी अभिमानासाठी लढण्यापर्यंत अनेक खटल्यांना तोंड दिलंय, त्यामुळे मला कोणीचं थांबवू शकत नाही; संजय राऊत यांची कंगना रनौतवर खोचक टीका)

दरम्यान, महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये 20 हजार 206 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट हा 75.36 टक्के इतका झाला आहे. आतापर्यंत राज्यात 60 लाखाहून अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 12,42,770 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 18 लाख 70 हजार 200 जण होम क्वारंटाइन