महाराष्ट्रातील विविध ठिकाणी संततधार कोसळत (Maharashtra Rains Updates) असलेल्या मुसळधार पावासाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्रालयातून आढावा घेतला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाकडून माहिती घेऊन काही सूचनाही केल्या. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, होणारं नुकसान मोठं आहे. परिस्थिती चिंताजनक आहे. पुढेही राहील. असे असले तरी जीव वाचविण्यास सध्या सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांनी कोणत्याही स्थितीत प्रशासनाला सहकार्य करावे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना सांगितलेकी,रायगड जिल्ह्यात तळगी गावात दरड कोसळल्यामुळे सुमारे 35 जणांचा बळी गेला आहे. अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या भागात राहणऱ्या लोकांना स्थलांतर आणि सुरक्षीत ठिकाणी घेऊन जाण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत.
कोकण आणि उर्वरीत महाराष्ट्रात पावासाने जोरदार हाहाकार माजवला आहे. अनेक गावे, शहरे पाण्यात गेली आहेत. अशा स्थितीत गर्भगळीत झालेली जनता प्रशासनाकडे अपेक्षेने पाहात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान स्थितीचा आढावा गुरुवारी (23 जुलै) घेतला. या वेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि इतर विभागांना एकमेकांच्या संपर्कात राहून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. अनेक ठिकाणी नदीच्या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे अवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. प्रामुख्याने डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. (हेही वाचा, Maharashtra Rains Updates: दरड कोसळून मोठा अपघात, रायगड जिल्ह्यात 36, साताऱ्यात 8 ठार; अनेक बेपत्ता, घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली)
उद्धव ठाकरे म्हणाले, पाठिमागील चार-पाच दिवसांपासून मी सातत्याने आढावा घेत आहे. निसर्गाचे एकूण वर्तन पाहता आपल्याला काही शब्दांची व्याख्याच बदलावी लागणार आहे. पडणारा पाऊस पाहता ती केवळ अतवृष्टीच नाही. तर त्याच्याही पलीकडे जाऊन पाऊस कोसळतो आहे. कालच माझे आणि पंतप्रधानांचे बोलणे झाले. महाराष्ट्रात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक ती मदत देण्याचे अश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
एएनआय ट्विट
Due to landslides in Talai village, Raigad around 35 people have lost their lives. Rescue operation is underway at many places. I have ordered the evacuation & relocation of people who are living in areas where there is a possibility of landslide: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/neZl4BsDqE
— ANI (@ANI) July 23, 2021
दरम्यान, मुसळधार पवासामुळे (Maharashtra Rains Updates) राज्यात विविध जिल्ह्याध्ये मोठे अपघात घडले आहेत. प्रामुख्याने रायगड (Raigad District) आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून (Raigad Landslide) झालेल्या अपघातात 32 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. रायगडमध्ये आतापर्यंत पावसामुळे 36 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. 42 जण अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातही पाटण तालुक्यात दरड कोसळून (Satara Landslides) दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. या दुर्गटनेत चार घरं ढिगाऱ्याखाली दबली असून, 14 जणांचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. साताऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत 8 जण ठार झाल्याची माहिती आहे. 27 जणांना सुखरुप वाचविण्यात यश आले आहे.