Maharashtra Rains: राज्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस; वीज कोसळल्याचीही घटना, अहमदनगर जिल्ह्यात गाय, बैल ठार
Rain | mage Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Maharashtra Rain Update: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रविवारी (9 ऑगस्ट) सायंकाळी वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Rain) पडला. काही ठिकाणी वीज (Thunderstorms) कोसळण्याच्याही घटना घडल्या. पालघर (Palghar Distric) जिल्ह्यातील आंबिस्ते येथे पडलेल्या पावसात आज सायंकाळी चारच्या दरम्यान जोरदार पाऊस पडला. या वेळी एका वस्तीवर विज कोसळून एक जण जागीच ठार झाला. तर, पाच जण जखमी झाले. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात वीज कोसळून एक गाय आणि बैलाचा मृत्यू झाला.

पालघर येथील वीज कोसळल्याच्या घटनेत सागर शांताराम दिवा (वय 17 वर्षे) हा अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला. तर संदीप अंकुश दिवा (वय 25 वर्षे), अनंता चंद्रकांत वाघ (वय 24 वर्षे), रविंद्र माधव पवार (वय 18 वर्षे), नितेश मनोहर दिवा (वय 19 वर्षे), सनी बाळू पवार (वय 18 वर्षे) हे पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर खानिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर अल्याचे समजते.

डहाणू तालुक्यातही वीज कोसळल्याची घटना घडली. डहाणू तालुक्यातील तवा नावमाडा येथील नितेश हाळ्या तुंबडा हा विशीतील तरुण वीज कोसळून ठार झाला. या घटनेत अनिल सुधाकर धिंडा हाही विशीतील तरुण ठार झाला. जखमी अनिल धिंडा याच्यावर वेदात रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हेही वाचा, Monsoon Updates In Palghar: पालघर येथे अंगावर वीज पडून 2 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी)

दरम्यान, अहमदनगर, औरंगाबाद, सांगली, सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वीज कोसळून एक गाय आणि बैलाचा मृत्यू झाला. ही घटना गुंजाळवाडी पठार परिसरात घडली. याशीवाय अनेक ठिकाणी दमदार पावसामुळे वाहने पाण्याखाली गेली. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. डोगरांना, दऱ्यांतून पाणी वाहू लागले.