यंदा जुलै पासून सुरु झालेल्या पावसाने राज्यात पुरता हाहाकार माजला होता. कोल्हापूर,पुणे सह काही ठिकाणी कित्येकवेळा पुराचा देखील फटका बसला. आता ऑक्टोबर महिना संपायला येत असताना सुद्धा पाऊस काही केल्या परतायला तयार नाही. अशातच राज्यात उद्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या (Maharashtra Assembly Elections 2019 Voting) दिवशी ठाणे (Thane), रायगड (Raigad), मुंबई (Mumbai) व उपनगरात (Mumbai Suburbs) पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. उद्या सकाळी 8.30 वाजल्यापासून ते 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 पर्यंत काही ठिकाणी वीज व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्यातर्फे (IMD) सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 ऑक्टोबर रोजी येत्या दोन दिवसात पाऊस पूर्णतः परतणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. मात्र वातावरणाचे सद्य परिस्थिती पाहता साधारण 22 ऑक्टोबर पर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाणे येथे 800 मतदान केंद्र ही खुल्या मैदानात पार पडणार असल्याने या पावसाचा काहीसा फटका उद्या मतदानाच्या टक्क्यावर पडण्याची शक्यता आहे.
ANI ट्विट
India Meteorological Dept (IMD), Mumbai: Thunderstorm accompanied with lightning likely to occur at isolated places in the district of Raigad on 21st and 22nd October. Forecast and warning for any day is valid from 8:30 am of day till 8:30 am of next day. #Maharashtra
— ANI (@ANI) October 20, 2019
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून मुंबई सह पालघर, नवी मुंबई येथे सुद्धा तुरळक पावसाची रिपरिप सुरु आहे. परिणामी ऑक्टोबर हॉटपासून काहीशी सुटका मिळून मुंबई व उपनगरातील तापमान 26.7 डिग्रीपर्यंत खाली आले होते. शनिवारी 19 ऑक्टोबर पर्यंत कुलाबा परिसरात 6.6 mm आणि सांताक्रूझ येथे 7.4 mm इतका पाऊस नोंदवण्यात आला होता.